वायचाळ पिंंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:30 AM2021-02-10T04:30:03+5:302021-02-10T04:30:03+5:30
हिंगोली : वायचाळ पिंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
हिंगोली : वायचाळ पिंपरी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
९ फेब्रुवारी रोजी सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया ८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमन सातकर यांना तिच्या नातेवाईक मंडळींनी बिनविरोध निवडून आणले होते. यानंतर सदरील महिलेस विरोधी लोकांनी गायब करुन अज्ञात स्थळी ठेवले होते. या महिलेचा शोध तिच्या नाईवाईकांस तिची मुलगी सुद्धा करीत होती. यानंतर सुमन सातकर यांचा शोध लागल्यानंतर सुमन यांना चक्कर आली व त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. चक्कर येवून पडल्यामुळे सुमन सातकर यांना मार लागला. पण या महिलेने राजकीय सुडापोटी ज्या महिलांचा संबंध नाही. त्या महिलांचे नाव सुद्धा गुन्ह्यात सांगितले आहे. या सर्व महिलांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहे. यामुळे गावातील शांतता भंग झाली असून ज्या महिलांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहे. या प्ररकणातील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे वायचाळ पिंपरी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर बापुराव सोळंके, विश्वास सोळंके, ज्ञानेश्वर देवकर, अमोल देवकर, अरुण देवकर, अनिल देवकर, गंगाराम मुधोळकर, पंडीत देवकर, अरुण सोळंके, संतोष सोळंके, मारोती देवकर, सुरेश देवकर, विष्णु भगत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.