हिंगोलीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:55 IST2018-08-13T16:53:49+5:302018-08-13T16:55:59+5:30
शहरातील कमलानगर येथे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

हिंगोलीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
हिंगोली : शहरातील कमलानगर येथे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली. संगीता साहेबराव ठोके ( ४० ) असे मृत महिलेचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास संगीता यांनी घर आतून बंद करत गळफास घेतला. शेजारील नागरिकांनी दरवाजा तोडून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. आत्महत्यचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रकीर्या सुरू आहे.