दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 07:12 PM2021-05-21T19:12:58+5:302021-05-21T19:13:29+5:30
बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठसे तज्ञांच्या गाडीत बसून येत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गाडीला एका मालवाहू टिप्परने जोराची धडक दिली होती. या घटनास्थळापासून केवळ शंभर मीटर अंतरावर हा दुसरा अपघात तीन तासानंतर झाला.
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : नांदेड- हिंगोली रोडवरील आडा पाटीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा अपघात दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाला. शेख समीना शेख जब्बार ( महादेववाडी, हिंगोली ) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या अशी माहिती बिट जमादार संजय मार्के यांनी दिली.
बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठसे तज्ञांच्या गाडीत बसून येत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गाडीला एका मालवाहू टिप्परने जोराची धडक दिली होती. या घटनास्थळापासून केवळ शंभर मीटर अंतरावर हा दुसरा अपघात तीन तासानंतर झाला. या अपघातात सत्रामूळे नांदेड - हिंगोली रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती. जमादार संजय मार्गे, जाधव, चालक मुलगीर हे घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. दुसऱ्या दुचाकीवरील चालक व लहान मुलगी या अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.