जिंनिगमध्ये काम करणाऱ्या महिलेचा बेल्टमध्ये पदर अडकल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 02:43 PM2021-10-29T14:43:13+5:302021-10-29T14:43:33+5:30
डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
वसमत : हयातनगर फाट्यावरील ओंकार फँब्रीक्स जिनिंगमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ३५ वर्षीय महिला काम करत असताना, तिचा पदर बेल्टमध्ये अडकल्याने महिला ओढल्या गेली. यादरम्यान तिच्या डोक्यास गंभीर मार लागत तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
वसमत तालुक्यातील हयातनगर फाट्यावर असलेल्या पुर्णा ओंकार फँब्रीक्स जिनिंगमध्ये २९ ऑक्टोबर शुक्रवार रोजी १२ वाजेच्या दरम्यान जिनिंगमध्ये काम करणारी महिला माया कपिल भुमरे वय ३५ रा. जवळा खंदारबन या महिलेचा पदर बेल्टमध्ये आडकला, याप्रसंगी तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी, एच. गोरे, विभुते यांनी भेट देऊन पंचनामा केला. मयत महिलेचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आनण्यात आले होते. सदरील प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत महिलेस दोन लहान मुली आहेत.