सोशल मीडियावरही महिलांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:12+5:302021-07-28T04:31:12+5:30
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक काहीजण महिलांशी मैत्री करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. यातून महिलांची पिळवणूक होते. ...
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
काहीजण महिलांशी मैत्री करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. यातून महिलांची पिळवणूक होते. बदनामीच्या भीतीने बहुतांश महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळेच साेशल मीडियातून ब्लॅकमेल करणाऱ्यांचे फावत आहे. जिल्ह्यातही अशा घटना घडल्या आहेत.
न घाबरता तक्रार करावी
महिलांचा सोशल मीडियावर छळ होत असल्यास त्यांनी न घाबरता तक्रार करावी.
कुठल्याही पोलीस ठाण्यात किंवा सायबर विभागाकडे अर्ज करावा. ही माहिती गुप्त ठेवली जाते.
सायबर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला जेरबंद केले जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
येथे करा तक्रार
१) महिलांकरिता दामिनी पथक आणि भरोसा सेल आहे. तेथे त्या थेट तक्रार करू शकतात.
२) महिलांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर आहे. सायबर पोलिसांशी संपर्क करूनही महिला त्यांच्याकडे तक्रार नोंदवू शकतात.
३) स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास आरोपींविरुद्ध ठोस कारवाई करणे शक्य होते.
अशाप्रकारे होतो छळ
घाणेरडे मेसेज पाठविणे
फोटो एडिट करणे
वारंवार मिस्ड कॉल देणे
अश्लील इमोजी
फोटो व्हिडिओ व्हायरल करणे
बनावट अकाउंट तयार करणे
सायबरसेलकडे आलेल्या तक्रारी
जिल्ह्यात महिलांचा हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग, महिला अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल होतात. २०२१ या वर्षात हुंडाबळीचे ३, बलात्काराचे २, विनयभंगाचे ११ तर महिला अत्याचाराचे १४ गुन्हे मे अखेरपर्यंत दाखल झाले होते. तसेच अनोळखी नंबरवरून मेसेज केल्याप्रकरणीही गुन्हे दाखल आहेत. मात्र सोशल मीडियावरून महिलांचा छळ केल्याचे किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती समजू शकली नाही.