दारुबंदीसाठी महिला सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:43 AM2018-10-24T00:43:59+5:302018-10-24T00:44:16+5:30
तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध दारु विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही अवैध दारुविक्री तत्काळ थांबवण्याची मागणी महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध दारु विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही अवैध दारुविक्री तत्काळ थांबवण्याची मागणी महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
गोजेगावात अनेक महिन्यांपासून अवैधपणे देशी दारुची विक्री होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून भांडण, हाणामारीच्या घटनांत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम कुटूंबावर होत असल्याने संतप्त महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून फौजदार राहुल तायडे यांना दारु बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. निवेदनावर रेखा खिल्लारे, सुप्रिया खिल्लारे, गंगुबाई खिल्लारे, वंदना खिल्लारे, सुरेखा खिल्लारे, सुमन खिल्लारे, सुशिला खिल्लारे यांच्यासह आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.