आई जगदंबा प्रतिष्ठानतर्फे महिला शिक्षिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:36+5:302021-01-08T05:36:36+5:30
आई जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने ३ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी ...
आई जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने ३ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या उपप्रदेशाध्यक्षा तथा आई जगदंबा प्रतिष्ठानच्या महिला समितीच्या प्रमुख ज्योती कोथळकर, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्या माधवी पाटील गोरेगावकर, पोतदार जम्बो किडस्च्या मुख्याध्यापिका संध्या तोम्मर, प्रा. ज्योती भिसे, डाॅ. राधिका देशमुख यांची उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर महिला शिक्षिका गुजर, प्रा. ज्योती भिसे, माधवी पाटील गोरेगावकर, संध्या तोम्मर, श्रीमती वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप ज्योती कोथळकर यांनी केला.
शिक्षण दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षिका
शारदा गणेशराव शिंदे, माधवी प्रशांतराव पाटील गोरेगावकर, ज्योती मच्छिंद्रनाथ भिसे, ज्योती आनंदराव वाघमारे, सुनीता अकमवार, उषा दिनकरराव घुले, सुनंदा दत्तराव तावडे, अपर्णा साहू, शारदा दादाराव गुजर, अरुणा कुंडलिक कोरडे, अनुराधा सरनाईक, पूनम रवी नायक, संध्या तोम्मर, आशा सुधाकर सूर्यवाड, आशाताई वाघमारे, कल्पना वानरे, ज्योती पडोळे, अनुसया देशमुख, योगिता देशमुख, रेखा साबळे या शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जया पवार, जगजितकौर अलग, लोखंडे, शिंदे, कोरडे, वंदना धूत, साधना पारेकर, सुप्रिया हिरास यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्तमराव लोखंडे, इरवंत बत्तलवाडीकर, नागनाथ लोखंडे, संजय भुमरे, घनश्याम धूत, गजानन बांगर, गोविंद बियाणी यांनी परिश्रम घेतले.