कनेरगाव ग्रा.पं.वर महिलांचा घागरमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:30 AM2018-12-25T00:30:02+5:302018-12-25T00:30:44+5:30
हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका, मोप गट ग्रामपंचायतीवर मोप येथील महिला व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगावनाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका, मोप गट ग्रामपंचायतीवर मोप येथील महिला व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढला.
गावातील दलित वस्तीमध्ये हातपंप असून गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. याबाबत वेळोवेळी मोप येथील ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच यांना कळवून सुद्धा काही उपाय न झाल्याने जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अॅड. विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोप येथून वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. परंतु यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सेवकाशिवाय ग्रामसेवक, सरपंच, सदस्य कोणीच हजर नसल्यामुळे पोलिसांनी हिंगोली पंचायत समितीला कळविले. त्यानंतर बिडीओ व ग्रामविस्तार अधिकारी भोजे यांनी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
पिण्याच्या पाण्याची त्वरीत व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय राऊत, कनेरगाव शाखाप्रमुख रामेश्वर सोळंके, रविशंकर, रमेश कोरडे, बबन ढाकरे व मोप येथील महिला, पुरूषांची उपस्थिती होती.