वाळूमाफियाने तलाठ्याच्या अंगावर घातले टिप्पर
By admin | Published: January 18, 2017 12:43 PM2017-01-18T12:43:16+5:302017-01-18T12:43:16+5:30
वाळू वाहतूक करणा-या टिप्परच्या चालकाने कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याच्या अंगावर टिप्पर घातले. या प्राणघातक हल्ल्यात तलाठ्याने दुचाकीवरुन उडी मारुन स्वतःचा जिव वाचवला.
Next
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 18 - वाळू वाहतूक करणा-या टिप्परच्या चालकाने कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याच्या अंगावर टिप्पर घातले. या प्राणघातक हल्ल्यात तलाठ्याने दुचाकीवरुन उडी मारुन स्वतःचा जिव वाचवला. मात्र यात यात दुचाकीचे नुकसान झाले.
नांदेड-हिंगोली मार्गावर आखाडा बाळापूरनजीक कांडली फाट्यावर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाळूचे टिप्पर (क्र.एमएच २६-एडी ४४२७) नांदेडहून बाळापूरकडे येत होते.
वारंगा सज्जाचे तलाठी गहनीनाथ दंडिमे यांनी दुचाकीवरुन वाळूमाफियाचा पाठलाग केला. यावेळी टिप्परच्या समोर दुचाकी आडवी ठेवून त्यांना चालकाला गाडी रस्त्याशेजारी उभी करायला सांगितली. पण टिप्पर न थांबवता त्याने तलाठ्याच्या अंगावर घातले. दंडिमे यांनी दुचाकीवरून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला.
यानंतर दंडिमे यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बाळापूर पोलिसांनी टिप्परसह चालकाला ताब्यात घेतले आहे.