हिगोली जिल्ह्यात २,२४० सिंचन विहिरींची कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 03:09 PM2020-11-07T15:09:14+5:302020-11-07T15:10:30+5:30
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मंजूर सिंचन विहिरींच्या कामांना ब्रेक लागला होता.
हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ हजार याप्रमाणे १० हजार सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १४७ विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यातून २ हजार २४० विहिरींची कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून ३ हजार ५१७ कामे प्रगतीपथावर आहेत; तर १ हजार ३९० विहिरींच्या कामांना प्रारंभ केला जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मंजूर सिंचन विहिरींच्या कामांना ब्रेक लागला होता. ऑक्टोबर अखेरपासून मात्र ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील १ हजार ६५५ विहिरींना मंजुरी मिळाली आहे. वसमतमध्ये ९८४, हिंगोलीत १ हजार ६६७, कळमनुरीत १ हजार ३९७ आणि सेनगाव तालुक्यात १ हजार ४४४ अशा एकंदरित ७ हजार १४७ विहिरींना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत २ हजार २४० कामे पूर्ण झाली असून ३५१७ कामे प्रगतीपथावर आहेत.
औंढा तालुक्यातील २७, वसमत ३८, हिंगोली ७१, कळमनुरी २३ आणि सेनगाव तालुक्यातील ३१ अशा एकूण १९० सिंचन विहिरींचा १९७.८७ लाखांचा निधी शासनाकडे प्रलंबित असून त्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.