‘रास्ता रोको’चा इशारा देताच कामाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:09+5:302021-01-04T04:25:09+5:30
कळमनुरी : तालुक्यातील माळेगाव ते शेंबाळ पिंपरी रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. या रस्त्याची दुरूस्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा ...
कळमनुरी : तालुक्यातील माळेगाव ते शेंबाळ पिंपरी रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. या रस्त्याची दुरूस्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी दिला होता. मगर यांनी इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवार, २ जानेवारीपासून या रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात केली आहे.
माळेगाव ते शेंबाळ पिंपरी राज्य मार्ग क्रमांक २५७ ची दुरवस्था झाल्याने तो दुरूस्त करावा अन्यथा सोमवार, ४ जानेवारी रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा अजित मगर यांनी दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात केली आहे. अतिवृष्टीने रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते तसेच गिट्टीही उखडली होती. त्यामुळे वाहनांचे अपघात वाढले होते. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता, तो तातडीने दुरूस्त करावा, अशी मागणी मगर यांनी केली होती. वार्षिक देखभाल व दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २७ लाखांच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा काढून कामाला सुरूवात करण्यात येईल. रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे आपले रास्ता रोको आंदोलन रद्द करावे, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी मगर यांना २९ डिसेंबर रोजी दिले. त्यामुळे मगर यांनी त्यांचे रस्ता रोको आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. परंतु, ६ कोटींच्या रस्ता सुधारणा निधीच्या कामाची निविदा दोन ते तीन महिन्यात न निघाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. दिनांक ४ जानेवारी रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. फाेटाे नं १२