पुसेगाव येथे भगवान बाहूबली यांच्या मूर्तीचे कार्य प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:29 AM2021-05-23T04:29:08+5:302021-05-23T04:29:08+5:30
श्रमण मुनी श्री १०८ विशेषसागर महाराज यांच्या सान्निध्यात भगवान बाहुबली यांच्या मूर्तीचे कार्य चालू आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वांत उंच ...
श्रमण मुनी श्री १०८ विशेषसागर महाराज यांच्या सान्निध्यात भगवान बाहुबली यांच्या मूर्तीचे कार्य चालू आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वांत उंच अशी ३१ फूट मूर्ती व ५ फूट उंच कमळ तसेच १५ फूट उंच वेदी असे एकूण ५१ फूट उंचीची प्रतिमा पुसेगाव येथे उभारण्यात येणार आहे. पुसेगाव हे जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र होत आहे. यामध्ये समाजबांधव मूर्ती निर्माण करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. तसेच मूर्ती निर्मितीनंतर भगवंताचा महामस्तकाभिषेक व पंचकल्याणक प्रतिष्ठाण महामहोत्सव होणार आहे. भगवंताच्या प्रतिमेचे कार्य ७५ टक्के पूर्ण झाले असून, सध्या वेदीचे कार्य सुरू आहे. लवकरच मुनी १०८ विशेषसागर महाराज यांच्या सान्निध्यात संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. त्यांचे गुरू आचार्य १०८ विरागसागर महाराज यांचा संघ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. तसेच मूर्ती लवकरच कमळ स्तरावर विराजमान होणार आहे, अशी माहिती मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष राजेंद्र जैन, कार्याध्यक्ष रविकुमार कान्हेड, प्रमुख कैलास भुरे यांनी सांगितली.