हिंगोलीत कोषागार कार्यालयाचा कारभार ठप्प; कोट्यवधींची देयके रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:21 PM2019-12-17T14:21:08+5:302019-12-17T14:35:08+5:30

यावरून नाराजी व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

work slow down in treasury office of Hingoli; Billions of payments have been stopped | हिंगोलीत कोषागार कार्यालयाचा कारभार ठप्प; कोट्यवधींची देयके रखडली

हिंगोलीत कोषागार कार्यालयाचा कारभार ठप्प; कोट्यवधींची देयके रखडली

Next

हिंगोली : जिल्ह्यात बीएसएनएलच्या सेवेचे तीनतेरा वाजलेले असल्याने अनेक बँका, शासकीय कार्यालयांनी खाजगी इंटरनेट सुविधा वापरून कारभार सुरळीत केला असताना कोषागार कार्यालय मात्र बीसएनएलच्या सेवेची प्रतीक्षा करीत बसले आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून एकही बिल निघाले नसल्याची बोंब उठली आहे.

मागील काही दिवसांपासून बीएसएनएलच्या सेवेला विविध रस्ते व इतर प्रकल्पांमुळे होत असलेल्या खोदकामांचा फटका बसत आहे. त्यातच बीएसएनएलची यंत्रणाही कमालीची उदासीन असल्याने दुरुस्तीच्या नावाने बोंबाबोंब आहे. परिणामी, अनेक ठिकाणी ही सेवा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर इतर सर्वच ठिकाणी ही सेवा सुरळीत झाली. मात्र जिल्हा कोषागार कार्यालयात काही इंटरनेटची सुविधा सुरळीत झाली नाही. त्यामुळे या कार्यालयात कोट्यवधींची देयके पडून असली तरीही त्याकडे कोषागार कार्यालयाचे दुर्लक्ष आहे. 

विविध कंत्राटांची देयके तसेच कर्मचाऱ्यांच्या पगाराची देयकेही यात अडकून पडली आहेत. कोषागार कार्यालयातून देयक मंजूर होत नसल्याचे सांगून लेखा विभागातील लिपिकवर्ग हैराण असल्याचे चित्र विविध शासकीय कार्यालयांत पहायला मिळत आहे. बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा अनेक कार्यालयांतून याबाबत ओरड सुरू झाली आहे. मात्र बीएसएनएलची सेवा सुरळीत होत नसल्याने खाजगी सेवेची व्यवस्था करून देयके मंजूर करण्यासाठी कोषागार कार्यालयाची कोणतीच धडपड दिसत नाही. यावरून नाराजी व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे काही उपकोषागार कार्यालयांचा कारभार सुरळीत असताना जिल्हा कोषागारातच समस्या असल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शिक्षकांचे वेतन रखडले
याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कावरखे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन कोषागारात कनेक्टिव्हिटी नसल्याने रखडले आहे. मागील काही दिवसांपासून हेच उत्तर ऐकायला मिळत आहे. यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

Web Title: work slow down in treasury office of Hingoli; Billions of payments have been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.