गणवेश वाटप योजनेची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:19 PM2018-07-08T23:19:36+5:302018-07-08T23:19:57+5:30

दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. मात्र मोफत गणवेश वाटपाची कामे जिल्ह्यात संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 Work of uniform distribution scheme | गणवेश वाटप योजनेची कामे संथगतीने

गणवेश वाटप योजनेची कामे संथगतीने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. मात्र मोफत गणवेश वाटपाची कामे जिल्ह्यात संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शालेय गणवेशासाठी शासनाकडून ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. परंतु सदर रक्कम अद्याप शाळास्तरावर वर्ग करण्यात आली नाही, शिवाय तसा अहवालही शिक्षणाधिकाºयाकडे सादर केलेला नाही. १५ जुलै पर्यंत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनी शाळेतील विद्यार्थी संख्या व वर्ग केलेल्या रक्कमेचा तपशिल मागविला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असल्यामुळे आता तरी गणवेश वेळेवर मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ४०० रूपये देण्याची तरतूद होती. आता यामध्ये बदल करून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत आता दोन गणवेशांसाठी ६०० रूपये लाभाची रक्कम दिली जाणार आहे. डीबीटीनुसार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. एकही लाभार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिल्या होत्या. परंतु सदर गणवेश वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालकांच्या तशा तक्रारीही आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना लवकर गणवेश तरी वाटप होतील.
२०१७-१८ शैक्षणिक वर्षात गतवर्षी दिवाळी जवळ आली तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. शिवाय शिक्षण खात्याकडे गणवेश योजनेचा अहवालही वेळेत सादर करण्यात आला नाही. शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला सूचना असतात. परंतु दरवर्षी हे नियोजन बारगळते. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत २०१८-१९ मोफत गणवेश वाटप योजनेतील पात्र विद्यार्थ्याची तालुकानिहाय संख्या हिंगोली १५ हजार २५३, सेनगाव १४ हजार ३१६, वसमत १४ हजार ४६७, कळमनुरी १४ हजार ६०७ तसेच औंढा नागनाथ ११ हजार ८०२ एकूण ७० हजार ४४५ अशी आहे.

Web Title:  Work of uniform distribution scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.