वसमत उपविभागात अडताहेत कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:19 AM2019-03-05T00:19:17+5:302019-03-05T00:20:07+5:30
वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे.
वसमत उपविभागाला कर्णेवार यांच्या रूपाने राष्टÑीय महामार्ग विभागातून आलेला उपअभियंता मिळाला. मात्र त्यांना वसमतमध्ये कोणताच रस नाही. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला जाण्याचीही त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला जाण्याचीही त्यांना ओढ लागली आहे. तर पदोन्नती मिळणार असल्याचे सांगून चक्क कामे अडविण्याचाच प्रकार घडत असल्याची सार्वत्रिक बोंब उठली आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून बोंब होत असली तरीही आतापर्यंत सबुरीने चाललेले प्रकरण आता हातघाईवर आले आहे. जिल्हा परिषदेत नियमितपणे घडणाऱ्या घटना लक्षात घेता ही बाब धोकादायकच दिसत आहे. इतरत्र काहीही असो मात्र या प्रकरणात जि.प.पदाधिकारी व सीईओंपर्यंत जाऊन आल्यानंतरही सुधारणा होताना दिसत नाही. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेत उमटताना दिसत आहेत.
समजावले आहे-सीईओ
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड म्हणाले, सदस्यांच्या तक्रारींनंतर कर्णेवार यांना सूचना दिल्या आहेत. तत्काळ सुधारणा करण्यास सांगितले आहे. तरीही सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल.
तक्रारी रास्त-उपाध्यक्ष
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, वसमत उपविभागातील बहुतेक सदस्यांनी तक्रारीचा सूर आळवल्याने ही बाब मी सीईओ यांच्याकडेही मांडली. संबंधित अभियंत्यांनाही सूचना दिल्या. मात्र सुधारणा दिसत नसल्याने सदस्यांचा रोष आहे. पुन्हा एकदा संबंधितांना बोलावून सांगण्यात येईल. मात्र मार्च एण्डच्या तोंडावर सुधारणा नसल्यास नक्कीच कारवाई होईल.