‘सुजाण पालकत्व’ या विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:00 AM2018-12-02T01:00:25+5:302018-12-02T01:00:54+5:30
येथील तोष्णीवाल महाविद्यालय ए.आर.टी.एम. इंग्लिश स्कूल व सहकाररत्न ओमप्रकाश देवडा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलनात सुजाण पालकत्व या विषयावर कार्यशाळेस चांला प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील तोष्णीवाल महाविद्यालय ए.आर.टी.एम. इंग्लिश स्कूल व सहकाररत्न ओमप्रकाश देवडा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलनात सुजाण पालकत्व या विषयावर कार्यशाळेस चांला प्रतिसाद मिळाला.
अध्यक्षस्थानी सुभाषअप्पा एकशिंगे, तर मुख्य व्याख्याते रमेश परतानी होते. यावेळी बी.आर. तोष्णीवाल, पंकज तोष्णीवाल, रमण तोष्णीवाल, कैलास साबू, मॅगरिटा, मॅरी बेग, प्राचार्य डॉ. एस.एम. वडगुले, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, प्राचार्य बलराम डिगल आदी उपस्थित होते. रमेश परतानी यांनी सुजाण पालकत्वाची संकल्पना सोदाहरण समजून सांगितली. मीपणामुळेच खरा अंधार पसरला असून तो सोडावयास हवा. पाल्याचा आय.क्यू. ०६ पर्यंत जास्तीत जास्त वाढवता येतो. या वयोगटातील पाल्यासाठी पालकांनी जागृत असणे गरजेचे असते. पाल्य १६ वर्षाचे होईपर्यंत पालकांची जबाबदारी खूप मोठी आहे. शिस्त व दंड या दोन्हीही बाबी पाल्यासाठी गरजेच्या आहे. सुरूवातीचा सहा वर्षाचा कालखंड पाल्यांचा बिजारोपणाचा असतो. प्रत्येक पाल्य हे प्रतिभासंपन्न आहे. फक्त त्यांची जाणीव पालक या नात्याने करणे गरजेचे आहे.
सोळा वर्षापर्यंत आई-वडिलांनी पाल्याचा सखा म्हणून भूमिका बजावावी. तेरा ते एकोणवीस या वयोगटातील पाल्यांची जबाबदारी पालकांनी समर्थपणे सांभाळावी. योग्य वेळी स्वातंत्र्य व अचूकवेळी नियंत्रण ठेवणे यामुळे नक्कीच मुलांच्या विकासाला पूरक ठरू शकतात. ही वेळ पालकांना ओळखता आली पाहिजे. सूत्रसंचालन डॉ. एस.आर.पजई यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद घन यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.