घाटेअळी नियंत्रणाबाबत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:53+5:302021-01-08T05:38:53+5:30
या संदर्भात धारखेडा, सुरवाडी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. औंढा नगानाथ तालुक्यात हरभरा पिकाचा पेरा एक हजार हेक्टरच्या ...
या संदर्भात धारखेडा, सुरवाडी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. औंढा नगानाथ तालुक्यात हरभरा पिकाचा पेरा एक हजार हेक्टरच्या वर असून वातावरणात बदल होत असल्याने घाटेअळीने हरभरा पिकावर आक्रमण केले आहे. थंडी व धुके पडत असल्याने शेतकऱ्यांनी घाटेअळीचे नियंत्रण योग्य प्रकारेे करणे आवश्यक आहे. तुषार सिंचनमार्फत पाणी देणे आवश्यक आहे. हरभरा पिकास भारी जमिनीत ४० व ६० दिवसांनी दोन पाणी पाळ्या देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्याचप्रमाणे हलक्या जमिनीत या पिकास तीन वेळा पाणी द्यावे व बुरशीनाशक औषधी फवारून घाटेअळीवर नियंत्रण करण्याचे आवाहन पोखरा योजनेचे समन्वयक शिवाजी शेळके यांनी केले. कार्यशाळेस सुरवाडी व धारखेडा गावचे शेतकरी उपस्थित होते.
फोटो नं. ३