जागतिक आरोग्य दिन; मार्गदर्शन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:02 AM2018-04-07T00:02:34+5:302018-04-07T00:02:34+5:30

जिल्हा आरोग्य विभागातर्फे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हिंगोली येथील जि. प. च्या षटकोणी सभागृहात आरोग्य माहिती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 World Health Day; Guidance Program | जागतिक आरोग्य दिन; मार्गदर्शन कार्यक्रम

जागतिक आरोग्य दिन; मार्गदर्शन कार्यक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा आरोग्य विभागातर्फे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हिंगोली येथील जि. प. च्या षटकोणी सभागृहात आरोग्य माहिती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, डॉ. गोपाल कदम, डॉ. संदेश पोहरे, साथरोग अधिकारी गणेश जोगदंड, सतीश रूणवाल, गजानन चव्हाण, पी. एस. तुपकरी आदी उपस्थित राहणार आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रा. बाळासाहेब साळवे, प्रा. किशोर इंगोले, सुखदेव बलखंडे, मदन मार्डीकर आदी आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
‘सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार यंदा जागतिक आरोग्य दिन साजरा केला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हे घोषवाक्य निवडले असून त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा विविध योजनांची जनजागृती व आरोग्य सेवा याबाबत परिश्रम घेणार आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवश्यकतेनुसार सर्व आरोग्य सेवा सुविधा कुठलाही आर्थिक ताण सहन न करता मिळावा असे या घोषवाक्याचा अर्थ आहे. जि. प. आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अधिकारी व कर्मचारी अडचणींना तोंड देत जबाबदारी पार पाडत आहेत. जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, टी.बी. मुक्त भारत अभियान, राष्टÑीय कीटकजन्य रोग नियंत्रण, दुर्धर आजारी लोकांना आर्थिक मदत, असांसर्गिक रोगाचे निदान व उपचार, तपासणी शिबिरे घेतली जात आहेत.

Web Title:  World Health Day; Guidance Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.