दहावीची परीक्षा रद्द केली; शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:48+5:302021-05-18T04:30:48+5:30
पुढे काय होणार, हा प्रश्नच यंदा दहावीचे वर्ग नियमित भरलेच नाहीत. आता परीक्षा रद्द झाली. सरसकट विद्यार्थी यामुळे उत्तीर्ण ...
पुढे काय होणार, हा प्रश्नच
यंदा दहावीचे वर्ग नियमित भरलेच नाहीत. आता परीक्षा रद्द झाली. सरसकट विद्यार्थी यामुळे उत्तीर्ण होणार आहेत. पुढे काय होणार, हा प्रश्नच आहे. मात्र ही परीक्षाच रद्द झाल्याने आम्ही भरलेले शुल्क शिक्षण विभागाने परत केले पाहिजे.
-ऋतुजा दराडे, हिंगोली
यंदा दहावीचे वर्ष असल्याने जोमाने अभ्यास केला. ऑनलाईन व कधी नियमित अशा प्रकाराने जीव मेटाकुटीला आला होता. मात्र नंतर परीक्षाच रद्द झाली. आता परीक्षा शुल्क तरी परत मिळणार की नाही? हा प्रश्नच आहे.
- वरूण नलगे, हिंगोली
"यावर्षी इयत्ता दहावीचे वर्ष असूनही कोरोना मुळे पूर्ण वर्ग भरलेच नाहीत. शाळा नाही व आता तर परीक्षाही नाहीत,अभ्यास मेहनतीने केला होता. परीक्षा फिस भरली होती, ती परत मिळणे अपेक्षित होते,पण अजून मात्र मिळाली नाही.
-मंजूषा जाधव, बोराळा
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा ५३
प्रतिविद्यार्थी परीक्षा शुल्क ४१५
दहावीतील एकूण विद्यार्थी १४७५०
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम ६१.२१ लाख
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र शासनाने परीक्षा शुल्क परत करण्याबाबत अजून काही निर्देश दिलेले नाहीत. जर तसे काही आदेश आले तर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. मात्र तूर्त तरी तसे काही आदेश आलेले नाहीत.
-संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी