वर्ष उलटूनही खुडज बंधा-याची कामे सुरू होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:56 PM2017-12-16T23:56:16+5:302017-12-16T23:56:24+5:30

तालुक्यातील खुडज येथे गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेत जिल्हाधिका-यांच्या हस्ते चार बंधाºयांचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु सदर कामास अद्यापही सुरूवात झाली नसल्याची तक्रार खुडज येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

The year has not yet started | वर्ष उलटूनही खुडज बंधा-याची कामे सुरू होईनात

वर्ष उलटूनही खुडज बंधा-याची कामे सुरू होईनात

googlenewsNext
ठळक मुद्देसेनगाव: जिल्हाधिका-यांनी केले होते भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील खुडज येथे गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेत जिल्हाधिका-यांच्या हस्ते चार बंधाºयांचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु सदर कामास अद्यापही सुरूवात झाली नसल्याची तक्रार खुडज येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील खुडज व पुसेगाव येथे चार बंधारे गतवर्षी मंजूर झाले होते. सदर बंधा-याच्या कामाचे जिल्हाधिकाºयांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु वर्षे उलटले तरीही या बंधाºयाचे कामच झाले नसल्याने खुडज येथील ग्रामस्थांनी सदर बंधाºयाची कामे तत्काळ सुरू करावेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. सदर काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनात केली असून या संबंधी उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर बाजार समिती संचालक दत्तराव टाले, गजानन घोशीर, विठ्ठल घोशीर, कैलास गुंजाळकर, श्रीरंग रहाटे, नारायण दुमणे आदींची नावे आहेत.

Web Title: The year has not yet started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.