येहळेगाव सोळंके ग्रामस्थांनी चार तास अडविले ११ टिप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:19 AM2021-02-19T04:19:27+5:302021-02-19T04:19:27+5:30

गावामध्ये व शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्यामुळे अनेक बैलांना जखमी व्हावे लागले. गावातून जाणाऱ्या येहळेगाव-हिंगोली रस्त्याच्या ...

Yehalegaon Solanke villagers blocked 11 tippers for four hours | येहळेगाव सोळंके ग्रामस्थांनी चार तास अडविले ११ टिप्पर

येहळेगाव सोळंके ग्रामस्थांनी चार तास अडविले ११ टिप्पर

Next

गावामध्ये व शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्यामुळे अनेक बैलांना जखमी व्हावे लागले. गावातून जाणाऱ्या येहळेगाव-हिंगोली रस्त्याच्या साईट पट्ट्या भरल्या नसल्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच येहळेगावातील एकाला अपघातात प्राण गमवावे लागले आहे. तरीही केटीआयएल कंपनी उर्वरित काम करीत नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला. यामुळे कंपनीचे ११ टिप्पर चार तास अडवून ठेवले. याची माहिती मिळताच पोनि वैजनाथ मुंडे, ज्ञानेश्वर गोरे घटनास्थळी दाखल झाले.

दोन दिवसांत रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन कंपनीचे अनुपचंद राठोड यांनी गावकऱ्यांना दिले. त्यानंतर येहळेगाव ग्रामस्थांनी टिप्पर सोडून दिले. यावेळी गजानन सोळंके, संतोष सोळंके, रावसाहेब सोळंके, सुदर्शन मुदनर, केशव शिंदे, विनोद सोळंके, बाबाराव इंगळे, उत्तम मुदनर, सुदर्शन सोळंके, अविनाश सोळंके, प्रसाद सोळंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रीया

येहळेगाव गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या साईट पट्ट्या भरल्या नाहीत. तसेच शेत व गावामध्ये जाणारा रस्ता केटीआयएल कंपनीने केला नसल्यामुळे आम्ही त्यांचे टिप्पर चार तास अडवून ठेवली.

- भुजंग सोळंके, उपसरपंच येहळेगाव

फोटो नं. ०८

Web Title: Yehalegaon Solanke villagers blocked 11 tippers for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.