नांगरणी करताना अंदाज चुकला; ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने तरुणाने जीव गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:49 IST2020-11-10T16:48:43+5:302020-11-10T16:49:43+5:30
सचिनचा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभागी होता.

नांगरणी करताना अंदाज चुकला; ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळल्याने तरुणाने जीव गमावला
आखाडा बाळापूर : नांगरणीचे काम करत असताना शेतातील विहिरीत ट्रॅक्टरसह पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. सचिन मिरासे असे मृत तरुणाचे नाव असून कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. सचिनचा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभागी होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन मिरासे हा कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील रहिवासी होता. मंगळवारी सकाळी सचिन ट्रॅक्टरने शेतात नांगरणीचे काम करत होता. यावेळी जमिनीचा अंदाज न आल्याने सचिन ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह आणि ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश आले. सचिन मिरासे हा मराठा शिवसैनिक सेनेचा पदाधिकारी होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही त्याच सक्रीय सहभाग होता. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.