मटक्याच्या पैशातून ‘त्या’ युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:22 AM2018-11-06T00:22:33+5:302018-11-06T00:22:56+5:30
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.
वाई गोरखनाथ येथील यूवक नागराज खंदारे (२८) याचा मृतदेह चोंडी रेल्वेस्टेशन येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात सापडला होता. मयत हा मिस्त्री काम करतो. त्याला मटका लागला होता. त्यामुळे मटका एजन्टकडे पैसे मागण्यासाठी तो गेला असता मटका एजन्ट व मयत नागराज खंदारे यांच्यामध्ये वाद झाला. मटक्याची उधारी देण्यावरुन झालेल्या वादानंतर पाच जणांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण केली होती. त्यात मयत नागराज खंदारे हा जागीच मरण पावला आहे. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली होती. सकाळी १ नोव्हेंबर रोजी मयताचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. काही संशयीतांना पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदर घटनेमुळे मागील काही दिवसांपासून परिसरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. अखेर याप्रकरणी पाचव्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बाबाराव खंदारे यांच्या फिर्यादीवरुन करुंदा पोलीस ठाण्यात आरोपी राहुल सरोदे, अशोक सरोदे, संदीप मोरे, सुमित सरोदे, राहुल मगरे (सर्व रा. चोंढी रेल्वेस्टेशन) या पाच जणांविरोधात भादंवि कलम ३०२, २०१,१०९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. मटक्याचा जुगार लागला होता त्यातून या मयताचा बळी गेला आहे. या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिराने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अजून फरारच आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
४७ वाहनचालकांवर कारवाई; दंड वसूल
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४७ वाहन चालकांकडून पोलिसांनी ९ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबविण्यात येते. त्या अनुषंगाने मंगळवारी ही कारवाई केली.