पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:48+5:302021-01-10T04:22:48+5:30

२०११ मध्ये जनगणना झाली होती. त्या जनगणेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर ...

Young upset over cancellation of police recruitment GR | पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

Next

२०११ मध्ये जनगणना झाली होती. त्या जनगणेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर जवळपास १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे. आजमितीस लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे एक पोलीस आहे, अशी परिस्थिती येते. अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने हे सर्व सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. एकंदर पोलीस भरती संदर्भात नवीन ‘जीआर’ निघेल आणि पोलीस भरतीचे स्वप्न साकार होईल, अशी आशा तरुणांना आहे.

जिल्ह्यात १२३५ लोकांमागे एक पोलीस

हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी आहे. पोलिसांची संख्या जिल्ह्यात १ हजार १०० जवळपास आहे. लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे एक पोलीस असा येऊ शकतो. हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या कमी आहे. अजून हिंगोली जिल्ह्याला पोलीस विभागात मनुष्य बळाची गरज आहे.

गत दोन वर्षांपासून आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी मी सराव करीत आहे. मैदानावर सकाळ आणि सायंक़ाळी रोज जात असतो. गोळाफेक, धावणे, लांब उडी, तसेच पोलीस भरती संदर्भातील पुस्तकांचेही वाचन केले आहे. परंतु, अचानक जीआर रद्द झाल्याने नाराजी आहे.

- ओम जगताप,

इसापूर, ता. हिंगोली

पोलीस विभागात भरती होऊन देशसेवा करण्याची माझी लहानपणापासून मनोमन इच्छा आहे. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी गाव सोडले आहे. हिंगोली शहरात दोन हजार रुपये किराया असलेल्या खोलीत राहतो. माझी परिस्थितीही हलाकीची आहे.

‘जीआर’ रद्द झाल्याने माझा हिरमोड झाला आहे.

- रवी घुगे,

सेलसुरा, ता. कळमनुरी

शासनाने पोलीस भरती होणार हा जीआर काढल्यानंतर खूप आनंद वाटला. मेहनतीला फळ मिळेल असेही वाटले होते. परंतु, अचानक शासनाने जीआर ऱद्द केल्याने थोडी नाराजी आहे. शासन पोलीस भरतीचा जीआर नव्याने काढले जाईल, अशी आशाही आहे.

- हरीष पुंडगे, शाहूनगर, ता. हिंगोली

Web Title: Young upset over cancellation of police recruitment GR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.