आपल्या वाहनावर दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:10+5:302021-09-27T04:32:10+5:30
वाहनावर दंड आहे का, या ॲपवर शोधा १) आपल्या वाहनावर थकीत रक्कम आहे का, याचा तपशील आरटीओ नावाच्या ॲपवर ...
वाहनावर दंड आहे का, या ॲपवर शोधा
१) आपल्या वाहनावर थकीत रक्कम आहे का, याचा तपशील आरटीओ नावाच्या ॲपवर पाहता येतो. चलन तपासा या ऑप्शनवर क्लिक करून दिलेल्या ठिकाणी वाहनाचा क्रमांक टाकून वाहनावरील चलन तपासता येते.
२) तसेच महाट्रॅफिक ॲपच्या माध्यमातूनही वाहनावरील चलन तपासता येते. चलन पे या ऑप्शनवरून थकीत रक्कमेचा भरणाही करता येतो.
पोलीस अधिकाऱ्याचा कोट
वाहनधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसवरील लिंकवरून अथवा कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन किंवा गणवेशातील वाहतूक पोलिसांकडे एटीएमद्वारे स्वाईप करून किंवा रोखीने चलन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी थकीत रकमेचा त्वरित भरणा करावा.
-चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, हिंगोली
रुपये १,४१,००,३०० चा दंड येणे बाकी
जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मधील कारवाई
एकूण कारवाई ३७,४८६ - दंड १,५८,१६,७००
रक्कम वसूल - ३३६० -दंड १७,१६,४००
थकीत रक्कम - ३४,१२६ दंड १,४१,००,३००