जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:34 AM2018-11-15T00:34:20+5:302018-11-15T00:34:44+5:30

जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 Zee's power cuts in front of power | जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच

जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या टेकूवर जि.प.चे अध्यक्षपद बळकावलेल्या शिवसेनेने काँग्रेसलाच पाण्यात पाहण्याची भूमिका घेतल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत आहे. आधी किरकोळ असणारा हा वाद नंतर पराकोटीचा वाढण्यामागे विधानसभा निवडणुकीची किनार आहे. एकतर जि.प.त मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप वाढत असल्याने जि.प.ची मंडळीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला हवा देण्याचे काम काही बाह्यघटक करीत आहेत. मात्र जि.प. पदाधिकाºयांनी कधी या मंडळींना यात लक्ष न घालण्यासाठी विनवले नाही. विशेष म्हणजे आमदार मंडळीही आमच्या कामात हस्तक्षेप होत असल्याचे सांगत असल्याने दोन्ही हातांनी टाळी वाजत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेत काल घडलेल्या प्रकारानंतर तर आता युतीतील घटक पक्षांत पडलेली ठिणगी नवे पेच उभे करणारी दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या आखणीनुसार भविष्यात पेच निर्माण होणे अपरिहार्य दिसत आहे. यात भाजपची भूमिका मात्र महत्त्वाची राहणार आहे.
या घटनेनंतर काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांनी शिवसेना दादागिरी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला भिक घालणार नसल्याचे सांगितले. तर विकासकामे केल्याने मते मिळतात. दादागिरीने नव्हे, याचे भान सेनेच्या कार्यकर्त्यांना राहिले नसल्याचे ते म्हणाले. तर सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सेनेला सत्तेचा मोह नाही. मात्र आमच्या कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक अडवणूक खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले.

Web Title:  Zee's power cuts in front of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.