जि.प. सदस्य देणार धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:32 AM2018-10-26T00:32:59+5:302018-10-26T00:33:20+5:30

पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली.

 Zip Follows Members | जि.प. सदस्य देणार धरणे

जि.प. सदस्य देणार धरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पंचायत राज व्यवस्थेला मूठमाती देत आपल्याच पदरात सगळे पाडून घेण्याचा घाट विधिमंडळ व संसद सदस्य करु लागल्याची तिखट प्रतिक्रिया जि.प. पदाधिकारी व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला मिळाली.
जि.प.तील या बैठकीस जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, बाबा नाईक, भानुदास जाधव, गटनेते अंकुश आहेर, मनीष आखरे आदींची उपस्थिती होती. सर्वपक्षीय सदस्य बैठकीत दिसत होते. घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी ज्या बाबी जि.प.कडे सुपूर्द केल्या. त्यातील अनेक बाबी हळूहळू राज्य शासनाने पुन्हा आपल्या अखत्यारितल्या विभागांना वर्ग केल्या. अजूनही हा प्रकार थांबलेला नाही. आता तर बांधकाम विभागाला मिळणारा ३0५४ व ५0५४ या लेखाशिर्षांचा निधी नुसता नावालाच जि.प.कडे ठेवला आहे. नियोजन मात्र हिसकावले आहे. मग या सभागृहाची गरजच काय? असा सवाल सदस्यांनी केला. मिनी मंत्रालय म्हणून जि.प.ला मोठेपण द्यायचे, जि.प.च्या अध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असल्याचे सांगायचे अन् याच संस्थेवर अविश्वास दाखवायचा, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्य शासन अथवा विधिमंडळ, संसद सदस्य जि.प.च्या अधिकारावरच गंडांतर आणण्याचा चंग बांधून असतील तर त्यांना निवडणुकांत आमची किंमत दाखवून देवू, असा इशाराही सदस्य आक्रमकपणे दिसत होते.
विशेष म्हणजे दलित वस्तीच्या कामांनाही आराखड्याचे शेवटचे वर्ष असताना तक्रारी करून ब्रेक लावल्याची नाराजीही पोटतिडकीने मांडली जात होती. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचाही निर्णय घेण्यात आला. तर याबाबत ३0 आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय सदस्य सहभागी असल्याचे दिसून येत आहे.
नूर पालटला : स्वकीयांचीही नाराजी
या बैठकीत काही सदस्यांनी अगदी पोटतिडकीने निवडणुकीत केलेल्या कामांचा वरिष्ठ लोकप्रतिनिधींना विसर पडत असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपणही हे विसरले पाहिजे, असे मांडले. तर स्वकीयांविरोधात रणांगणात उतरण्याची वेळ आली तरीही मागे हटायचे नाही. यापूर्वी कधीच कोणत्या लोकप्रतिनिधींनी जि.प.तील आपल्या भावंडांना त्रास दिला नाही. लहान भाऊ म्हणूनच सांभाळले. मात्र ही मंडळी वाºयावर सोडत असेल तर आम्हीही भावकीची भिंत उभी करायला काय हरकत? असा सवाल केला.
मागील अनेक दिवसांपासून जि.प.पदाधिकारी व सदस्य त्यांच्या अधिकारांवर गंडांतर येत असल्याने नाराज होते. मात्र ती खदखद व्यक्त करण्यासाठी आजच्या बैठकीत व्यासपीठ मिळाले. त्यामुळे अनेकजण यात खुल्या दिलाने व्यक्त झाल्याचे दिसले.

Web Title:  Zip Follows Members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.