हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना जि.प.कडून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:13 AM2018-02-01T00:13:48+5:302018-02-01T00:14:08+5:30

यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या वतीने जिल्ह्यातील ४५ ठिकाणच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कामांचे नियोजन सुरू होते.

ZP approval for works of pilgrimage development in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना जि.प.कडून मंजुरी

हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना जि.प.कडून मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या वतीने जिल्ह्यातील ४५ ठिकाणच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कामांचे नियोजन सुरू होते.
यामध्ये हिंगोली तालुक्यात पाळेश्वर महाराज हेमाडपंती मंदिर फाळेगाव येथे पथदिवे व पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी ४ लाख, जागृत हनुमान हनुमान मंदिर देवस्थान माळहिवरा येथे पेव्हरब्लॉकसाठी ४ लाख, बाळसखा महाराज मंदिर पांगरी येथे पेव्हरब्लॉकला ४ लाख, पंचमुखी महादेव संस्थान सावा येथे भक्त निवास बांधकामास ७ लाख, नीळकंठ खोरेश्वर महादेव संस्थान कडती येथे पथदिवे ७ लाख, महादेव संस्थान वैजापूर येथे संरक्षक भिंतीस ४ लाख, खटकाळी हनुमान मंदिर मालवाडी येथे पेव्हर ब्लॉकसाठी ४ लाख, अमृतेश्वर महादेव मंदिर उमरा येथे पेव्हर ब्लॉकसाठी ८ लाख, पथदिवे ४ लाख, कळमनुरी तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर दाती येथे पथदिव्यांना ५ तर पेव्हर ब्लॉकसाठी ४ लाख, बहिरोबा महादेव संस्थान चाफनाथ येथे रस्ता व पुलासाठी १४ लाख, महादेव मंदिर कृष्णापूर येथे पेव्हर ब्लॉकसाठी २ लाख, विठ्ठल रुख्मीणी मंदिर शेवाळा येथे पथदिव्यांसाठी ५ लाख, दत्त मंदिर रेणापूर येथे पेव्हर ब्लॉकसाठी ४ लाख, भवानी मंदिर वारंगा फाटा येथे पेव्हर ब्लॉकसाठी ७ लाख, श्रीक्षेत्र महादेव मंदिर दांडेगाव भक्त निवास, सभामंडपासाठी १0 लाख, जटाशंकर मंदिर डोंगरकडा येथे पेव्हर ब्लॉक व भक्तनिवासासाठी १४ लाख, सेनगाव तालुक्यात महादेव मंदिर रमतेराम संस्थान कडोळी येथे संरक्षक भिंतीसाठी ५ लाख, महादेव मंदिर आजेगाव येथे पेव्हर ब्लॉकसाठी ४ लाख, मानकेश्वर देवस्थान पानकनेरगाव येथे पेव्हर ब्लॉक व पथदिव्यांसाठी ३ लाख, कुमारेश्वर संस्थान केलसुला येथे पथदिव्यांसाठी ४ लाख, कानिफनाथ गड खैरीघुमट येथे पेव्हर ब्लॉकसाठी ५ लाख, विठ्ठल रुख्मीणी मंदिर भानखेडा येथे पेव्हर ब्लॉक व पथदिव्यांसाठी ८ लाख, दिगंबर जैन मंदिर पुसेगाव येथे भक्तनिवास १२ लाख, तुळजाभवानी मंदिर पुसेगाव येथे पथदिव्यांसाठी १ लाख, माझोड देवी मंदिर येथे पथदिव्यांसाठी ४ लाख, नारायणगिरी बाबा संस्थान ताकतोडा येथे भक्तनिवास व सभामंडप- २0 लाख, औंढा नागनाथ तालुक्यातील गणपती मंदिर मेथा भक्तनिवास- २३ लाख, सिद्धनाथ मंदिर गांगलवाडी येथे घाट बांधकामास ७ लाख, खंडोबा मंदिर गोळेगाव येथे पाणीपुरवठ्यासाठी ७ लाख, सारंगस्वामी मठ संस्थान येथे पथदिव्यांसाठी ३ लाख, मिस्किनशहा दर्गा जवळा बाजार येथे पार्किंगसाठी ४ लाख, वसमत तालुक्यात बाराशिव हनुमान मंदिर बाराशिव येथे पार्किंग व पेव्हर ब्लॉक १४ लाख, पाणीपुरवठा ७ लाख, पथदिवे ४ लाख, दत्तमंदिर पांगरा शिंदे येथे संरक्षक भिंतीसाठी १.२५ लाख, रोकडेश्वर मंदिर पांगरा शिंदे येथे पेव्हर ब्लॉकसाठी २.७५ लाख, दुर्गामाता संस्थान कुरुंदा येथे पार्किंग व पेव्हर ब्लॉकसाठी १0 लाख, खोडकेश्वर मंदिर सोमठाणा येथे स्वच्छतागृहास ४ लाख, दत्तात्रय मंदिर भेंडेगाव पथदिव्यांसाठी ४ लाख, अन्नपूर्णा देवी संस्थान आरळ येथे पेव्हर ब्लॉकसाठी ६ लाख, पथदिव्यांसाठी ४ लाख, ओंकारेश्वर महादेव मंदिर आडगाव येथे पेव्हर ब्लॉक ४ लाख, उत्तरेश्वर महादेव मंदिर थोरावा येथे पेव्हर ब्लॉक ५ लाख, महादेव मंदिर माळवटा येथे पेव्हर ब्लॉक ५ लाख, आनंद बौद्धविहार कौडगाव येथे संरक्षक भिंतीस ४ लाख, हफिज अली दर्गा येथे पेव्हर ब्लॉक ४ लाख, महादेव मंदिर पिंपळा चौरे पेव्हर ब्लॉक ४ लाख, बालाजी मंदिर शिवपुरी पेव्हर ब्लॉक व पार्किंगसाठी ७ लाख दिल्याचे जि.प. उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले.

Web Title: ZP approval for works of pilgrimage development in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.