जि.प.चे शिष्टमंडळ जिल्हा कचेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:12 AM2018-08-21T01:12:25+5:302018-08-21T01:12:42+5:30
जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख प्रश्न होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख प्रश्न होता.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेली रस्त्यांची लांबी जास्त असतानाही त्यातुलनेत निधी मिळत नाही. कसातरी ५0५४ या लेखाशिर्षांतर्गत निधी जि.प.कडे वर्ग झाला असल्याने सदस्यांच्या आशांना पंख फुटले होते. आपल्या सर्कलमधील एका गावाचा तरी रस्ता चकाचक होईल, ही अपेक्षा बाळगून होते. मात्र पहिल्यांदा निधी मंजूर झाला तेव्हा १.९८ लाखांच्या कामांची यादीच सोबत आली अन् या आशेवर पाणी फेरले गेले. आता नव्याने या लेखाशिर्षावर ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीत यावर बोलूही दिले जात नसल्याने अखेर काही अधिकाऱ्यांना विचारणा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. तर नियोजनही जि.प.नेच करायचे असते, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही नियोजन होत नसल्याने हे शिष्टमंडळ भेटले.
यामध्ये जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती भैय्या देशमुख, प्रल्हाद राखोंडे, अॅड. गयबाराव नाईक, अंकुश आहेर, विठ्ठल चौतमल, बालासाहेब मगर, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे आदींचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असली तरीही यातील चर्चेबाबत कोणीच काही बोलायला तयार नव्हते. एकंदर या रस्त्यांचे नियोजन वेळेत झाल्यास पुढील कामे वेळेत करणे सुकर होणार असल्याने निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे.