जि.प.त कर्मचारी कल्याण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:35 AM2018-05-01T00:35:59+5:302018-05-01T00:35:59+5:30
जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जाणार आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या विविध विभागाच्या कर्मचा-यांच्या आस्थापनाविषयक समस्या या अभियानात सोडविण्यात येणार आहेत. ज्यांची प्रकरणे नियमित काळात सुटली नाहीत, अशांनाही यात अर्ज केल्यास आपले लाभ मिळण्यासाठी सुलभता होणार आहे. १ एप्रिल २0१८ पासून सुरू झालेले हे अभियान ३१ मेपर्यंत राबविण्यात येणार आहे. पदोन्नतीबाबत आरक्षणाचा मुद्दा सध्या वादात असल्याने खुल्या प्रवर्गातील सर्व प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. तर कालबद्ध पदोन्नतीचीही गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्वच विभागांची प्रकरणे आता मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर स्थायीत्व प्रमाणपत्र, सेवापुस्तिका अद्ययावत करणे, गोपनीय अहवाल व प्रातिनिधिक अभिलेख वर्गीकरणाची कामेही यात केली जाणार आहेत. कर्मचाºयांच्या सेवाविषयक २0 ते २५ बाबींचा यात निपटारा केला जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरण असल्यास याबाबत जि.प. कर्मचाºयांनी अर्ज करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी केले आहे. यातील अनेक बाबींचे माहिती संकलन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पदोन्नतीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.