जि.प.त अभियंता दिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:55 AM2018-09-26T00:55:50+5:302018-09-26T00:56:17+5:30

शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश वायचारस्कर, पी.आर. नंदनवरे, राजाराम एडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ उपस्थित होते.

 ZP Engineer's Day Program | जि.प.त अभियंता दिन कार्यक्रम

जि.प.त अभियंता दिन कार्यक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश वायचारस्कर, पी.आर. नंदनवरे, राजाराम एडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ उपस्थित होते. कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे, जि.प.सदस्य दिलीप देसाई, विठ्ठल चौतमल, बाबू दळवी याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष आनंद पतंगे, सचिव रा.ना. कुलकर्णी उपस्थित होते. सर्वप्रथम सर मोक्षगुंडम यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्ज्वलन करून पूजन केले.
यानंतर मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अभियंता दिन कार्यक्रमासाठी माधव बाग औरंगाबादतर्फे आरोग्यविषयक विशेषत: हृदयरोगाबाबत तज्ज्ञ डॉ. प्रकाश जोंधळे, डॉ. रचना देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच (अ४३ङ्मूं)ि याबाबत नांदेड येथील प्रा.अभियंता अब्दुल हमीद यांचा सेमिनार आयोजित केला होता. याप्रसंगी अध्यक्ष आनंद पतंगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिव रा.ना. कुलकर्णी यांनी केले.
यावेळी संजय सदावर्ते, अभि.दिलीप पाईकराव, प्रदीप मुळे, बारी खॉन, संदेश जाधव, दत्तात्रय म्हस्के, रंगनाथ तरडे, बी.जे. सोनगी, विश्वनाथ गव्हाणे, एस.के. लोमकर, सचिन कोकडवार, अरुण अवसरमल, दासराव गिराम, अशोक पडोळे, हनुंमत मगर, वसंत वीर, प्रमोद उबारे, नितीन कोकडवार, संजय मंठेकर, मुरलीधर मुरक्या, तुंगेनवार, स्वामी, काचगुंडे, रेखा सोनटक्के, अर्चना कोरपेर, श्याम पवार, मधुकर खडके, रमेश सानप, मारोती बोबडे, संजय अग्रवाल, रामकृष्ण जवादे, शिवलिंग थोरात, आर.ए. बोरकर, रमेश सानप, स. सलीम, उपअभियंता सुनील कर्णेवार, कुपल, किशोर लिपणे, किशोर संद्री, सोमनाथ भागानगरे, शिवकुमार आदींची उपस्थिती होती.

Web Title:  ZP Engineer's Day Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.