मार्च एण्डपर्यंत जि.प.ची कामे पूर्ण झाली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:37 AM2018-02-03T00:37:34+5:302018-02-03T00:37:50+5:30
तीर्थक्षेत्र, रस्ते दुरुस्ती, किमान गरजा आदी कामांचे नियोजन झालेले असल्याने आता मार्च एण्डपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कंत्राटदारांचे लाड बिलकूल खपवून घेवू नका, असा स्पष्ट आदेश आजच्या बांधकाम समितीच्या बैठकीत जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तीर्थक्षेत्र, रस्ते दुरुस्ती, किमान गरजा आदी कामांचे नियोजन झालेले असल्याने आता मार्च एण्डपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कंत्राटदारांचे लाड बिलकूल खपवून घेवू नका, असा स्पष्ट आदेश आजच्या बांधकाम समितीच्या बैठकीत जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिला.
बांधकाम समितीच्या आजच्या बैठकीत मागील सभांमधील विविध विकास कामांना दिलेल्या मंजुरीबाबत चर्चा झाली. यातील रस्ते दुरुस्तीची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले. तर तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांपैकी २0 ते २५ कामांची अंदाजपत्रके तयार आहेत. त्यामुळे या कामांच्या निविदाही गतीने काढण्यास सांगण्यात आले. तर ज्या कामांची अंदाजपत्रके तयार करणे बाकी आहेत, तीही लवकर पूर्ण करण्यास सांगितले. त्याचबरोबर कामे वेळेत न पूर्ण झाल्याने पुढे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही कसर राहता कामा नये. कंत्राटदारांनी कामे दर्जेदारच केली पाहिजे, याकडे कटाक्ष ठेवण्यासही अधिकाºयांना सांगण्यात आले.
या बैठकीस जि.प.सदस्य बाळासाहेब मगर, दिलीपराव देसाई, मनीष आखरे, नीता दळवी आदींची उपस्थिती होती.