हॉकी इंडियाकडून  ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:11 AM2018-01-07T03:11:36+5:302018-01-07T03:11:42+5:30

बंगलोर येथे ७ ते १५ मार्चदरम्यान होणा-या ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची हॉकी इंडियाने निवड केली. हे खेळाडू प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहेत.

33 players selected for junior national camp from hockey India | हॉकी इंडियाकडून  ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची निवड

हॉकी इंडियाकडून  ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची निवड

Next

नवी दिल्ली : बंगलोर येथे ७ ते १५ मार्चदरम्यान होणा-या ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची हॉकी इंडियाने निवड केली. हे खेळाडू प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहेत.
शिबिरात मलेशियातील सुल्तान जोहोर कप स्पर्धेत कांस्यपदक पटकाविणा-या संघातील १८ सदस्यांचाही समावेश आहे. शिबिरात खेळाडूंच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. शिबिरात वरिष्ठ खेळाडूंसमवेत सराव करण्यासही मिळणार आहे.
फेलिक्स म्हणाले, ‘हे मोठे शिबिर आहे. आम्ही याचा वेगळ्या पद्धतीने वापर करणार आहोत. प्रामुख्याने आम्ही कौशल्य, तंदुरुस्ती, जलद हालचाल व खेळाच्या अन्य तांत्रिक बाबींकडे लक्ष देणार आहोत.’

संभाव्य खेळाडू असे : पंकजकुमार रजक, तनुज गुलिया, प्रशांत कुमार, सेंटामिज अरासू, सुमन बेक, हरमजित सिंग, मनदीप मोर, मोहम्मद फराज, प्रिन्स, प्रताप लकडा, वरिंंदर सिंग, सन्नी मलिक, विशाल अंतिल, यशदीप सिवाच, विशाल सिंग, विवेक सागर प्रसाद, अक्षय अवस्थी, सुखजित सिंग, रबिचंद्र सिंग मोइरांगथेम, दिनाचंद्र सिंग मोइरांगथेम, शीलानंद लाकडा, जयप्रकाश पटेल, दिलप्रीत सिंग, मोहम्मद सैफ खान, रोशन कुमार, अभिषेक, शिवम आनंद, राहुल कुमार राजभर, मोहम्मद अलिशान, संजय, मनिंदर सिंग, राहुल, आनंद कुमार बारा.

Web Title: 33 players selected for junior national camp from hockey India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी