अझलन शाह हॉकी : भारताने घालवली विजयाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:33 AM2018-03-05T02:33:30+5:302018-03-05T02:33:30+5:30
अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा लाभ घेत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करणा-या इंग्लंडने सामन्यात बरोबरी साधली.
इपोह - अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा लाभ घेत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करणाºया इंग्लंडने सामन्यात बरोबरी साधली.
या सामन्यात भारताने तब्बल नऊ पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. पेनल्टी कॉर्नर वाया घालविले, हे भारताचा आजचा विजय हुकल्याचे कारण ठरले. इंग्लंडविरुद्ध सामन्यातही भारताच्या युवा खेळाडूंनी आश्वासक खेळ केला. रमणदीप सिंग, तलविंदर सिंग, सुमीत कुमार यांनी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवले. आघाडीच्या फळीने वारंवार हल्ले चढवीत इंग्लंडवर दडपण आणले. पहिल्या सत्राच्या अखेरीस रमणदीप सिंग आणि तलविंदर सिंग यांच्या पासवर नवोदित शीलानंद लाक्राने गोल नोंदवीत आघाडी मिळवून दिली. रूपिंदरपाल आणि हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत खेळणाºया भारताचे ड्रॅगफ्लिकिंग अचूक नव्हते.
मध्यंतरापर्यंत भारताला तब्बल आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र एकावरही गोल होऊ शकला नाही. तिसºया सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला; मात्र भारताच्या बचावफळीने भक्कम बचाव करीत इंग्लंडच्या खेळाडूंचे मनसुबे हाणून पाडले.
भारतीय खेळाडूंची सामन्यावरील पकड पाहता, २७ व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत पहिला विजय नोंदविणार असे चित्र असताना, अखेरच्या पाच मिनिटात पंचांनी इंग्लंडला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. याचा फायदा घेत इंग्लंडच्या मार्क ग्लेघोरीनने
गोल नोंदवीत इंग्लंडला बरोबरी
साधून दिली. सोमवारच्या विश्रांतीनंतर भारताला नंबर वन आॅस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)