आशिया चषक महिला हॉकी: चीनवर विजयासाठी भारत सज्ज, आज अंतिम सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 03:34 AM2017-11-05T03:34:47+5:302017-11-05T03:34:55+5:30
विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.
काकामिगहरा, जपान : विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.
भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यात विजय मिळवाला. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्यफेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्या संघाने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०,चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.
भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते. गेल्या वेळी २०१३ मध्ये क्वालालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिसºया स्थानी होता. भारताने आतापर्यंत २००४ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
भारताने पुढच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महिला विश्वचषकासाठीची पात्रता मिळवली आहे. कर्णधार राणी रामपॉल हिने सांगितले की आम्ही या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठीच उद्याच्या सामन्यात खेळणार आहोत. आम्ही आशिया विजेते बनून विश्वचषकात जागा मिळवण्यास उत्सुक आहोत. पुरुष संघाने आशिया चषक जिंकल्याने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.
ड्रेसिंग रूमचे वातावरण खूपच चांगले आहे. आम्ही उत्साहित आहोत आणि अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयार आहोत.’
राणी पुढे म्हणाली की, ‘जपान विरोधातील सामना खूूपच चांगला होता. चांगली सुरुवात सगळ्यात जास्त गरजेची असते. संघातील प्रत्येक खेळाडूने या योगदान दिले आहे. आमच्या प्रशिक्षकांनी बनवलेल्या रणनीतीनुसार आम्हाला खेळ करावा लागेल आणि चुका होणार नाही याची काळजीदेखील घ्यावी लागेल. ’
राणीने सांगितले, ‘आम्हाला माहीत आहे की, चीनचा संघ चांगला आहे आणि उलटफेर करू शकतो.
(वृत्तसंस्था)
आम्ही त्यांना आधी पराभूत केले आहे. म्हणून आताही करू शकतो, असे नाही. आम्ही रणनीती तयार केली आहे. आणि आमचे त्यावरच फोकस आहे.’
गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियन्स चषकात चीनने भारतात साखळी फेरीत पराभूत केले होते. मात्र त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने चीनवर विजय मिळवला होता.