चक दे इंडिया! भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा उडवला धुव्वा, शेजाऱ्यांचं भविष्य चीनवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:17 PM2023-08-09T22:17:59+5:302023-08-09T22:19:10+5:30

Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : चेन्नईत सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखली.

Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : India beat pakistan by 4-0, Captain Harmanpreet Singh scored 2 goals & 1 each goal from Jugraj Singh & Akashdeep Singh  | चक दे इंडिया! भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा उडवला धुव्वा, शेजाऱ्यांचं भविष्य चीनवर अवलंबून

चक दे इंडिया! भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा उडवला धुव्वा, शेजाऱ्यांचं भविष्य चीनवर अवलंबून

googlenewsNext

Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : चेन्नईत सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखली. चेन्नईत सुरू असलेल्या या स्पर्धेत IND vs PAK सामना पाहण्यासाठी स्टेडियम हाऊसफूल होते. भारताचा फिरकीपटू आर अश्विन हा पण सामना पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारताने स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व कायम राखताना पाकिस्तानचा ४-० अशा धुव्वा उडवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल आणि जुगराज सिंग व आकाशदीप सिंग यांच्या प्रत्येकी १ गोलने भारताचा विजय पक्का केला. आता पाकिस्तानचे स्पर्धेतील पुढील आव्हान अन्य लढतीवर अलवंबून असणार आहे. 


आजच्या लढतीपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात जय पराजयाच्या आकडेवारीत ६४-८२ असे पारडे पाकिस्तानच्या बाजूने आहे. उभय संघांमधील ३२ लढती ड्रॉ राहिल्या आहेत. पण मागील दहा वर्षांत IND vs PAK यांच्यात झालेल्या २३ पैकी १४ लढती भारताने जिंकल्या आहेत आणि ४ ड्रॉ राहिल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक ६९ गोल्स झाले आहेत आणि पाकिस्तानला केवळ ३६ गोल्स करता आले आहेत. २०२३ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी भारताचा फिरकीपटू आर अश्विन हाही स्टेडियमवर उपस्थित होता. भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे, परंतु पाकिस्तानसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. India vs Pakistan


दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु भारतीय गोलरक्षक कृष्णा पाठक याने तितक्याच चपळाईने पाकिस्तानचा गोल रोखला. दोन्ही संघाकडून कट्टर सामना पाहायला मिळाला आणि पाकिस्तानचा आक्रमक भारताच्या बचावफळीने रोखून धरला होता. १५व्या मिनिटाला भारताकडून पलटवार झाला अन् मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानचे वर्चस्व राहिले, परंतु १५व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगच्या गोलमुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातील हरमनप्रीतच्या ( २३ मि.) आणखी एका पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर भारताने पहिल्या हाफमध्ये २-० अशी पकड बनवली.

पाकिस्तानकडून दर्जेदार खेळ झालेला पाहायला मिळाला, परंतु पहिल्या हाफमध्ये नशीब भारताच्या बाजूने होते. तिसऱ्या सत्रात भारताने तिसरा गोल केला अन् यावेळी जुगराज सिंगने ( ३६ मि.) पेनल्टी कॉर्नरवर यश मिळवून दिले. या गोलनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची संघर्ष करण्याची इच्छाशक्तीच गेलेली दिसली. भारताने ५ पैकी तीन पेनल्टी कॉर्नर यशस्वी करून दाखवले. चौथ्या सत्रात भारताने बचाव आणखी मजबूत करून पाकिस्तानला हतबल केले. त्यांच्या बचावातील त्रुटीचा फायदा उचवून आकाशदीप सिंगने ( ५५ मि.) अप्रतिम मैदानी गोल करून भारताचा ४-० असा विजय पक्का केला. 

Web Title: Asian Champions Trophy 2023 IND vs PAK : India beat pakistan by 4-0, Captain Harmanpreet Singh scored 2 goals & 1 each goal from Jugraj Singh & Akashdeep Singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.