आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाकिस्तान आज भिडणार! अतिआत्मविश्वास टाळावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:40 AM2023-08-09T05:40:10+5:302023-08-09T05:40:31+5:30

भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने चारपैकी तीन सामने जिंकले असून एक बरोबरीत सोडवला आहे.

Asian Champions Trophy: India-Pakistan will clash today! Avoid overconfidence | आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाकिस्तान आज भिडणार! अतिआत्मविश्वास टाळावा लागेल

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत-पाकिस्तान आज भिडणार! अतिआत्मविश्वास टाळावा लागेल

googlenewsNext

चेन्नई : उपांत्य फेरीत आधीच प्रवेश केलेल्या भारतीय संघाला बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडायचे आहे. उपांत्य फेरी निश्चित झाल्याने भारतासाठी हा औपचारिकतेचा सामना आहे. मात्र, अंतिम राउंड रॉबिन सामना पाकविरुद्ध असल्याने भारतीयांना अतिआत्मविश्वास टाळून खेळावे लागेल. 

भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने चारपैकी तीन सामने जिंकले असून एक बरोबरीत सोडवला आहे. पाकिस्तानला केवळ एक विजय मिळवता आला आहे. त्यांनी दोन सामने बरोबरीत सोडवले असून एका पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताविरुद्ध पराभूत झाल्यास पाकिस्तानला चीन-जपान सामन्यातील निकालावर अवलंबून रहावे लागेल. 

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी गुणतालिका
देश     सामने     विजय     अनिर्णीत     पराभव     गुण     गोल केले     गोल झाले 
भारत     ०४     ०३     ०१     ००     १०        १६     ०५
मलेशिया      ०४     ०३     ००     ०१     ०९        ११         ०८
द. कोरिया      ०४     ०१     ०२     ०१     ०५        ०४     ०४
पाकिस्तान      ०४     ०१     ०२     ०१     ०५        ०७     ०६
जपान     ०४     ००     ०२     ०२     ०२        ०६     ०९
चीन      ०४     ००     ०१     ०३     ०१        ०५     १५

पेनल्टी कॉर्नर देणे टाळावे लागेल : हरमन
‘भारतीय संघ पेनल्टी कॉर्नरवर जास्तीतजास्त गोल करण्यात यश मिळवत असून, याचा आनंद आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नर देण्यापासून आम्हाला सांभाळून खेळावे लागेल,’ असे भारताचा हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग याने सांगितले.  

Web Title: Asian Champions Trophy: India-Pakistan will clash today! Avoid overconfidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.