Asian Games 2018: महिलांच्या हॉकीमध्ये भारत अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:50 PM2018-08-29T19:50:44+5:302018-08-29T19:55:29+5:30

भारताच्या महिला हॉकी संघाने चीनवर 1-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

Asian Games 2018: India in women's hockey final | Asian Games 2018: महिलांच्या हॉकीमध्ये भारत अंतिम फेरीत

Asian Games 2018: महिलांच्या हॉकीमध्ये भारत अंतिम फेरीत

googlenewsNext
ठळक मुद्दे भारताकडून गुरजित कौरने हा निर्णायक गोल केला.

जकार्ता , आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या महिला हॉकी संघाने चीनवर 1-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.



 

दोन्ही संघांना तिन्ही सत्रांमध्ये एकही गोल करता नव्हता. पण अखेरच्या सत्रात भारताने सातव्या पेनेल्टी कॉर्नरवर गोल मारला आणि त्यांनी आपले खाते उघडले. भारताकडून गुरजित कौरने हा निर्णायक गोल केला.


भारत आणि चीन यांनी पहिल्या सत्रामध्ये थोडासा बचावात्मक खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नाही. पहिल्या सत्रात हा सामना गोलशून्य बरोबरीत होता. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. भारताला सहा पेनेल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्यांना एकाही कॉर्नरवर गोल करता आला नाही. अखेर सातव्या कॉर्नरवर त्यांनी आपला पहिला गोल करत खाते उघडले.


Web Title: Asian Games 2018: India in women's hockey final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.