Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:53 PM2018-08-27T13:53:06+5:302018-08-27T13:57:01+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ब गटात विजयी मालिका कायम राखताना अव्वल स्थान कायम राखले आहे
जकार्ता - आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ब गटात विजयी मालिका कायम राखताना अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र गटातील अन्य लढतींपेक्षा भारतीय महिलांना सोमवारी थायलंडने विजयासाठी संघर्ष करावा लागला. भारताने 5-0 अशा फरकाने हा विजय मिळवला. कर्णधार राणी रामपालने
पहिल्या दोन सत्रांत सामना गोलशून्य बरोबरीत राखून थायलंडने उत्तम खेळ केला. भारताला पाच कॉर्नर मिळाले, परंतु त्यावर त्यांना एकही गोल करता आला नाही.
It's Half Time in the match between Thailand and India!#AsianGames2018#AsiaHockey#WomensHockey#THAvINDpic.twitter.com/rYV3zwMOX5
— Asian Hockey Federation (@asia_hockey) August 27, 2018
मध्यंतरानंतर भारतीयांनी 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र त्यासाठी त्यांना 13 शॉट्स ऑन टारगेट मारावे लागले. सहाव्या कॉर्नरवर मोनिकाने गोल करताना भारताची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. तत्पूर्वी कर्णधार राणी रामपालने दोन मैदानी गोल केले होते. 54 व्या मिनिटाला नवज्योत कौरने सुरेख गोल केला. त्यात राणीने आणखी एका गोलची भर घातली. भारताने हा सामना 5-0 अशा फरकाने जिंकला.
India win their last group match against Thailand! #AsianGames2018#AsiaHockey#WomensHockey#THAvINDpic.twitter.com/e1TYddjXGK
— Asian Hockey Federation (@asia_hockey) August 27, 2018