Asian Games 2018: हॉकीमध्ये भारताकडून जपानचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 09:25 PM2018-08-24T21:25:51+5:302018-08-24T21:26:51+5:30
यापूर्वी भारताने इंडोनेशिया आणि हाँगकाँग यांचाही पराभव केला होता. या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा 8-0 असा धुव्वा उडवला. यापूर्वी भारताने इंडोनेशिया आणि हाँगकाँग यांचाही पराभव केला होता. या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
The competition at the pool stage intensifies with the conclusion of the third day of the men's hockey event at the @asiangames2018 on 24th August. Here's how each team stands after the matches played today. #IndiaKaGame#AsianGamespic.twitter.com/QYHRKe13Mn
— Hockey India (@TheHockeyIndia) August 24, 2018
जपानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. त्याचबरोबर दिलप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, अक्षदीप सिंग आणि सुनील एस. यांनी प्रत्येकी एक गोल केला.