Asian Games 2018: shocking... भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 09:15 PM2018-08-21T21:15:29+5:302018-08-21T21:17:30+5:30
भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी कझाकिस्तानवर 21-0 असा दणदणीत विजय मिळवला.
जकार्ता : भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी कझाकिस्तानवर 21-0 असा दणदणीत विजय मिळवला. भारताकडून गुरजित कौरने यावेळी सर्वाधिक चार गोल केले.
FT| The Indian Women's Hockey Team's fantastic all-round show during their game against Kazakhstan at the 18th Asian Games 2018 spurs the team on to an impressive 21-0 victory at the competition on 21st August 2018.#IndiaKaGame#AsianGames2018#INDvKAZpic.twitter.com/zkRidWMAwq
— Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2018
भारतीय संघाने सुरुवातीपासूनच कझाकिस्तानवर जोरदार आक्रमण लगावले. त्यामुळे पहिल्या सत्रापासून भारताने आघाडी घ्यायला सुरुवात केली. गुरजितने भारतासाठी चार, तर वंदना कटारिया लालरेमसियामी आणि नवनीत कौर यांनी प्रत्येकी तीन गोल केले. नवज्योत कौर आणि लिलिमा यांनी प्रत्येकी दोन गोल संघाच्या विजयात आपला वाटा उचलला, त्याचबरोबर उदिता, नेहा गोयल, मोनिका आणि दीपग्रेस यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारताच्या महिला हॉकी संघाचा पाहा हा व्हिडीओ