आशियाई हॉकी : भारताने उडविला जपानचा धुव्वा, ५-१ गोलने केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 08:13 PM2017-10-11T20:13:22+5:302017-10-11T20:13:36+5:30

हरमनप्रीतसिंगने केलेले दोन आणि एस. बी. सुनील, ललित उपाध्याय, रमणदीपसिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय पुरुष संघाने आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपान संघाचा ५-१ गोलने धुव्वा उडवून आपले विजयी अभियान सुरू केले.

Asian hockey: India defeated Japan, defeated Japan 5-1 | आशियाई हॉकी : भारताने उडविला जपानचा धुव्वा, ५-१ गोलने केले पराभूत

आशियाई हॉकी : भारताने उडविला जपानचा धुव्वा, ५-१ गोलने केले पराभूत

googlenewsNext

ढाका : हरमनप्रीतसिंगने केलेले दोन आणि एस. बी. सुनील, ललित उपाध्याय, रमणदीपसिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय पुरुष संघाने आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपान संघाचा ५-१ गोलने धुव्वा उडवून आपले विजयी अभियान सुरू केले.
नवीन मार्गदर्शक मारिन शअर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पहिलीच स्पर्धा खेळणा-या भारतीय संघाने सुरुवातीपासून नियोजनपूर्ण खेळ करीत प्रत्येक क्वॉर्टरमध्ये गोल केले. तिस-या क्वॉर्टरमध्ये त्यांनी दोन गोल केले. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाच्या एस. बी. सुनीलने आकाशदीपसिंगच्या मदतीने तिस-याच मिनिटाला गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर एकाच मिनिटानंतर जापानच्या किताजातोने गोल करून बरोबरी साधली. पण, नंतर भारतीय खेळाडूंनी जापानच्या आघाडीच्या फळीला गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही. नंतर भारतीय खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व राखले. त्याच्या ललित उपाध्यायाने २२व्या, रमणदीपसिंगने ३३व्या मिनिटाला गोल केले. हरमनप्रीतसिंगने ३५ व ४८व्या मिनिटाला दोन गोल केले. भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी बांगलादेश संघाविरुद्ध होईल.

Web Title: Asian hockey: India defeated Japan, defeated Japan 5-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी