आशियाई हॉकी :भारत-जपान लढत आज ,नंबर वन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:17 AM2017-10-11T01:17:43+5:302017-10-11T01:19:12+5:30
आशियाई गटात नंबर वन होण्याच्या इराद्याने भारतीय संघ बुधवारी आशियाई चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपानविरुद्ध आपले अभियान सुरू करेल.
ढाका : आशियाई गटात नंबर वन होण्याच्या इराद्याने भारतीय संघ बुधवारी आशियाई चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपानविरुद्ध आपले अभियान सुरू करेल. रोलेंट ओल्टमन्स यांच्या बरखास्तीनंतर भारतीय संघाचे नवीन मार्गदर्शक जोर्ड मारिन यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिली स्पर्धा असेल.
ओल्टमन्स यांनी मानांकनात भारतीय पुरुष हॉकी संघाला त्यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत १२ व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आणून ठेवले होते.
गत स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व या वेळी मिडफिल्डर मनप्रीत सिंहकडे सोपविण्यात
आले आहे.
अ गटात भारताबरोबर जपान, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि बांगलादेश, तर ब गटात गतविजेता कोरिया, मलेशिया, चीन आणि ओमान या संघाचा समावेश आहे.