तुफानी हल्ले चढवत कांगारुंनी ड्रॅगन्सचा ११-० ने पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:15 AM2018-12-08T04:15:37+5:302018-12-08T04:15:41+5:30
जागतिक क्रमवारीतील अव्वल ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करताना तुलनेत दुबळ्या असलेल्या चीनचा ११-० असा फडशा पाडला.
भुवनेश्वर : जागतिक क्रमवारीतील अव्वल ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करताना तुलनेत दुबळ्या असलेल्या चीनचा ११-० असा फडशा पाडला. यासह ऑसीने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या ‘ब’ गटात सर्वाधिक ९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यातच इंग्लंडला पराभूत करत बाद फेरी निश्चित केली होती.
एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ करत चिनी ड्रॅगन्सला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. तरी त्यांना विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा आपलाच विक्रम मागे टाकण्यात थोडक्यात अपयश आले. २०१० साली दिल्ली येथे आॅस्टेÑलियाने दक्षिण आफ्रिकेला १२-० असे लोळवले होते.
आॅस्टेÑलियाकडून ब्लेक गोवर्स याने हॅटट्रिक करुन चिनी संघाचे मानसिक खच्चीकरण केले. फ्लायन ओगिलिव्ह याने दोन गोल नोंदवले. तसेच जेक वेटॉन, अॅरन झलेवस्की, टॉम क्रेग, डायलन वॉदरस्पून आणि जेरेमी हेवार्ड यांनी प्रत्येकी एक गोल करत आॅस्टेÑलियाच्या दमदार विजयामध्ये योगदान दिले. (वृत्तसंस्था)