ऑस्ट्रेलिया आग : पुनर्वसनासाठी टीम इंडियाचा पुढाकार, केली लाखोंची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:32 AM2020-01-21T11:32:52+5:302020-01-21T11:33:28+5:30
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्यूमुखी पडले. आगीने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. याशिवाय साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. निसर्गाच्या या कोपानंतर येथील वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात क्रीडा क्षेत्रही मागे नाही. आता टीम इंडियानंही पुढाकार घेताना लाखोंची मदत जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलिया आग : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर मदतीला धावला, दिसणार मोठ्या भूमिकेत
पुनर्वसानासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बिग बॅश लीगमधून निधी गोळा केला. सामन्यातील प्रत्येक षटकारामागे 250 डॉलर देण्याचा निर्णय काही खेळाडूंनी घेतला. यात ख्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल आदी खेळाडूंचा समावेश आहे. टेनिसपटू रॉजर फेडररसह राफेल नदाल, सेरेना विलियम्स यांनीही निधी गोळा करण्यासाठी प्रदर्शनीय सामना खेळण्याचे कबुल केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि जादुई फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांनीही क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. शिवाय वॉर्ननं त्याची बॅगी ग्रीन कॅपच्या लिलावातून जवळपास पाच कोटी रक्कम उभी केली आहे.
ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत
....म्हणून लोकांना न्यूड फोटो पाठवून पैसे मागू लागली ही प्रसिद्ध मॉडेल, ८ कोटी केले जमा!
ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी
आता टीम इंडियानंही पुढाकार घेत ऑस्ट्रेलियातील पुनर्वसनासाठी 17 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही टीम इंडिया क्रिकेटपटूंची नसून हॉकीपटूंची आहे. हॉकी इंडियानं 25000 डॉलरचा निधी या पुनर्वसनासाठी देण्याचे जाहीर केले आहे. हॉकी ऑस्ट्रेलिया मंडळाचे अध्यक्ष मेलैन वूस्नाम यांनी हॉकी इंडियाचे आभार मानले आहेत. या निधीसाठी हॉकी इंडियानं भारतीय संघाच्या पुरुष व महिला कर्णधाराची स्वाक्षरी असलेली जर्सी लिलावासाठी ठेवली होती.