बेल्जियमचा भारतावर ३-१ ने विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:57 AM2017-08-12T00:57:12+5:302017-08-12T00:57:21+5:30

भारताच्या पुरुष हॉकी संघासाठी सध्याचा युरोप दौरा अतिशय खडतर ठरत आहे. बेल्जियमने शुक्रवारी सलग दुसºया सामन्यात भारतावर ३-१ ने विजय नोंदविला.

 Belgian 3-1 victory over India | बेल्जियमचा भारतावर ३-१ ने विजय

बेल्जियमचा भारतावर ३-१ ने विजय

Next

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष हॉकी संघासाठी सध्याचा युरोप दौरा अतिशय खडतर ठरत आहे. बेल्जियमने शुक्रवारी सलग दुसºया सामन्यात भारतावर ३-१ ने विजय नोंदविला.
प्रारंभी एक गोलने माघारल्यानंतरही यजमान संघाने शानदार खेळ करीत मुसंडी मारली. याआधी बुधवारी सलामीच्या सामन्यात या संघाने भारताचा १-० ने पराभव केला होता. भारताचा युवा गोलकिपर सूरज करकेरा याने पहिल्या काही मिनिटांत अप्रतिम कामगिरी करीत बेल्जियमचे सर्व हल्ले निष्फळ ठरविले.
या दौºयात भारताने युवा संघ पाठविला आहे. सिनियर राष्टÑीय संघात सहा नव्या चेहºयांना संधी दिली. भारताने धडक सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला अरमान कुरेशी याने गोलदेखील नोंदविला. भारताला आघाडी दुप्पट करण्याची संधी होती; पण पेनल्टी कॉर्नरवर गोल होऊ शकला नाही. भारतीय खेळाडूंनी मात्र बेल्जियमच्या गोलकिपरला सातत्याने त्रास दिला. कुरेशीने यानंतरही दोनदा हल्ले केले; पण गोलकिपरने भारताचे मनसुबे हाणून पाडले. भारताची आघाडी फार वेळ टिकू शकली नाही. पाच मिनिटांनंतर बेल्जियमने बरोबरी साधली. अमोरी कायस्टर्स याने नवव्या मिनिटाला गोल केला.
दुसºया क्वार्टरमध्ये बेल्जियमची कामगिरी अधिकच चांगली होती. लोइक लायपाएर्ट याने २१ व्या मिनिटाला ड्रॅग फ्लिकवर दुसरा गोल नोंदविला. मध्यंतराच्या काही सेकंद आधी व्हिक्टर व्हॅगनेज याने तिसरा गोल नोंदविताच भारत १-३ ने माघारला.
माघारल्यानंतर भारताने तिसºया क्वार्टरमध्ये गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला होता; पण मनदीपच्या डिफ्लेक्शनवर सुमित गोल नोंदवू शकला नाही. अखेरच्या क्वार्टरमध्येही मनदीप, कुरेशी आणि रमणदीप यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. बेल्जियमची बचाव फळी फारच भक्कम होती.
आता भारताला नेदरलॅन्डमधील वॉलविज्क येथे १३ आणि १४ आॅगस्ट रोजी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी आॅस्ट्रियाविरुद्ध एकमेव सामना खेळला जाईल.
भारतासाठी मिडफिल्डर चिग्लनेसनासिंग याचा आज १५० वा आंतरराष्टÑीय सामना होता. मणिपूरच्या या खेळाडूने २०११ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेद्वारे भारतीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून तो सातत्याने देशासाठी खेळत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Belgian 3-1 victory over India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.