युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास लाभ - पी. आर. श्रीजेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:52 AM2017-09-14T00:52:39+5:302017-09-14T00:52:57+5:30
युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास मलादेखील लाभ होणार असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा जखमी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीजेश गेले पाच महिने संघाबाहेर आहे. सध्या जखम सुधारण्याच्या स्थितीत असून, बंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात त्याने सहकारी खेळाडूंची भेट घेतली. येथेच श्रीजेशचे पुनर्वसन वेळापत्रक पूर्ण होत आहे.
बंगळुरू : युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास मलादेखील लाभ होणार असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा जखमी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीजेश गेले पाच महिने संघाबाहेर आहे. सध्या जखम सुधारण्याच्या स्थितीत असून, बंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात त्याने सहकारी खेळाडूंची भेट घेतली. येथेच श्रीजेशचे पुनर्वसन वेळापत्रक पूर्ण होत आहे. ज्येष्ठ खेळाडू असलेला श्रीजेश म्हणाला, ‘युवा खेळाडूंना माझ्या अनुभवाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. युवा खेळाडूंची कामगिरी जवळून पाहिल्यास, त्यांना प्रोत्साहन दिल्यास मलादेखील स्वत:चा खेळ सुधारण्यास लाभ होईल. त्यांच्याकडून काही शिकता येईल. मैदानावर पुनरागमन करेन तेव्हा या सर्वच बाबींचा लाभ होणार आहे.’
श्रीजेश राष्टÑीय शिबिरात सहकाºयांच्या मदतीसाठी आला आहे. ढाका येथे आगामी आशिया चषकासाठी संघाचा सराव सुरू असून, श्रीजेश गोलकीपर आकाश चिकटे, तसेच सूरज करकेरा यांना मार्गदर्शन करीत आहे. श्रीजेश मलेशियातील सुल्तान अझलान शाह हॉकी स्पर्धेदरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे लंडनमधील विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत खेळू
शकला नाही. मागच्या वर्षी
लंडनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात २९ वर्षांच्या श्रीजेशने मोलाची भूमिका बजावली होती.
सई केंद्रात उत्साहवर्धक वातावरणात मी जखमी असल्याचे विसरून गेलो, असे सांगून श्रीजेश म्हणाला, ‘दररोज हलका सराव
सुरू आहे. संघासोबत असलो की कठोर मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे मैदानावर पुनरागमनदेखील लवकर होते, असा अनुभव आहे.’ रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेणारे कोच मारिन शोर्ड यांच्या मार्गदर्शनात भारत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा श्रीजेशने व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
कामगिरीत सातत्य आणण्याचा प्रयत्न करणार
नवे कोच आल्याने संघाला नवी दिशा मिळेल. आम्ही कामगिरीत सातत्य आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे रँकिंगदेखील सुधारेल. माझ्यासह शिबिरात सहभागी असलेले सर्वच खेळाडू नव्या कोचच्या मार्गदर्शनात चांगले निकाल देण्याचा प्रयत्न करू, असा मला विश्वास आहे. - पी. आर. श्रीजेश, गोलकीपर भारत