मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:24 AM2017-09-09T00:24:37+5:302017-09-09T00:24:58+5:30

रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण ही प्रतीक्षा शुक्रवारी संपली.

 The chief coach of the Marine Shard Men's Hockey team, the Sports Minister, said | मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

Next

नवी दिल्ली: रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण ही प्रतीक्षा शुक्रवारी संपली.
पुरुष हॉकी संघासोबत काम करण्याचा फारसा अनुभव नसलेले महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक मारिन शोर्ड यांच्याकडे पुरुष
हॉकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक तसेच प्रबळ दावेदार समजले जाणारे हरेंद्रसिंग यांना महिला संघाचे नवे हाय परफॉमर्न्स संचालक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. भारतीय महिला संघ युरोप दौºयावरून परतताच मारिन हे २० सप्टेंबर रोजी नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. हरेंद्र मात्र उद्या पदभार स्वीकारतील. या निर्णयाची माहिती क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी टिष्ट्वटरवर दिली.
कोचच्या नियुक्तीचा निर्णय काहीसा आश्चर्यकारक आहे. ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर हॉकी इंडियाने तीन दिवसांपूर्वीच कोचपदासाठी जाहिरात दिली. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही जाहिरात कालच मागे घेण्यात आली.
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ भारतात घालविणारे मारिन या पदासाठी सर्वाधिक योग्य असल्याचा हॉकी इंडिया आणि साईचा समज आहे. मारिन हे सुरुवातीला जबाबदारी स्वीकारण्याच्या विचारात नव्हते. नेदरलॅन्डचे ४३ वर्षांचे मारिन यांची याच फेब्रुवारीत महिला संघाच्या कोचपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी याआधी पुरुष संघाला कधीही प्रशिक्षण दिले नाही. हॉकी इंडिया आणि साईने मनधरणी केल्यानंतर त्यांनी होकार दिल्याची माहिती पुढे आली आहे.
हॉकी दिग्गजांनी हा निर्णय भारतीय हॉकीला मागे नेणारा असल्याची टीका केली. पुढील वर्षी राष्टÑकुल आणि आशियाई तसेच यंदा विश्व लीग होणार आहे. त्यांनी याआधी नेदरलॅन्डच्या २१ वर्षे महिला संघाला विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात नेदरलॅन्डचा सिनियर महिला संघ विश्व लीगमध्ये सुवर्ण पदक विजेता ठरला. २०११ ते २०१४ या काळात ते २१ वर्षे गटाच्या नेदरलॅन्ड पुरुष संघाचेही मुख्य कोच होते.
शोर्ड मारिन यांच्या नियुक्तीवर दिग्गज झाले नाराज-
च्मारिन यांची हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी झालेली नियुक्ती माजी हॉकी दिग्गजांच्या पचनी पडलेली नाही. यावर अजितपालसिंग म्हणाले,‘मारिन यांनी पुरुष खेळाडूंना कधी प्रशिक्षण दिले नाही. शिवाय ते खेळाडूंना ओळखतही नाही.
च्दुसरीकडे हरेंद्र कधीही महिला संघाचे प्रशिक्षक नव्हते. आॅलिम्पिकच्या तयारीची वेळ जवळ आली असताना ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीचा निर्णय चुकीच्या वेळी झाला.’
च्माजी कर्णधार धनराज पिल्ले याने ‘हरेंद्र हे परुष हॉकीसाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे सांगितले. हा निर्णय हॉकीला मागे नेणारा आहे. हॉकी इंडियाला केवळ विदेशी कोच हवा आहे,’ असे म्हटले. आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या संघाचे खेळाडू राहिलेले जफर इक्बाल म्हणाले,‘हा निर्णय घेण्यामागे काही कारणे असतील. ओल्टमन्स यांच्यासारखी शैली असल्याने मारिन यांची नियुक्ती झाली असावी, असे मला वाटते.’
टिष्ट्वटरवर माहिती देताना राज्यवर्धनसिंग राठोड म्हणाले,‘भारतीय सिनियर पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी मारिन यांच्याकडे सोपविण्यात आली असून द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त हरेंद्र यांना महिला संघाचे कोच तसेच हाय परफॉमर्न्स संचालक नियुक्त करण्यात आनंद वाटतो.
दोघांची नियुक्ती २०२० च्या आॅलिम्पिकपर्यंत असेल.’ भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) व हॉकी इंडियाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगून मारिन यांनी जबाबदारी स्वीकारल्याचे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.
माझी पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी नियुक्ती झाल्याची माहिती ओल्टमन्स यांना दिली. मी त्यांचा आदर करतो. ते तयार असतील तर त्यांचा सल्ला घेण्याची इच्छा आहे. खेळात काम करताना खेळाडूंचा प्रतिसाद हवा असतो. खेळाडूंनी स्वत:चे लक्ष्य निर्धारित करावे. मी लक्ष्य गाठण्यास मदत करू शकतो. एखाद्यासाठी अंतर्आत्म्याचा आवाज हीच सर्वोत्तम प्रेरणा ठरते. -मारिन शोर्ड, प्रशिक्षक भारतीय हॉकी संघ

Web Title:  The chief coach of the Marine Shard Men's Hockey team, the Sports Minister, said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.