देवगिरी फायटर्सला विजेतेपद--: मराठा लाइट इन्फंट्री उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:44 AM2019-05-21T00:44:13+5:302019-05-21T00:45:48+5:30

लाईन बझार येथे आयोजित सतेज चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात देवगिरी फायटर्स संघाने दोन मराठा लाइट इन्फंट्री संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाला रोख आमदार सतेज पाटील व महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते

Degree Fighters winner - Maratha Light Infantry Runner-up | देवगिरी फायटर्सला विजेतेपद--: मराठा लाइट इन्फंट्री उपविजेता

देवगिरी फायटर्सला विजेतेपद--: मराठा लाइट इन्फंट्री उपविजेता

Next
ठळक मुद्देस्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू पद्मराज शिंदे (बेस्ट गोलकीपर - देवगिरी फायटर्स) गोवर्धन लोहार (बेस्ट बॅक - दोन मराठा लाइट इन्फंट्री) ओंकार कावरे (बेस्ट हाफ - देवगिरी फायटर्स) बेस्ट फॉरवर्ड - रईस मुजावर (दोन मराठा लाइट इन्फंट्री ) मॅन आॅफ द सिरीज - संदीप शिंदे सतेज चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा

कोल्हापूर : लाईन बझार येथे आयोजित सतेज चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात देवगिरी फायटर्स संघाने दोन मराठा लाइट इन्फंट्री संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाला रोख आमदार सतेज पाटील व महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या संघाला २५००० रुपये, फिरता चषक व उपविजेत्या संघास रोख १५००० व चषक तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघांना रोख ५००० रुपये देण्यात आले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात देवगिरी फायटर्स संघाने दोन मराठा लाइट इन्फंट्री संघाचा पेनल्टी स्ट्रोकवर ४-३ गोलनी पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. सामन्याच्या पूर्वार्धात सहाव्या मिनिटांस पेनल्ट्री कॉर्नरवर पहिला गोल केला. उत्तरार्धात ५३ व्या मिनिटास देवगिरी संघास पेनल्ट्री स्ट्रोक मिळाला. त्यावर सौरभ सुतारने गोल करीत सामना १-१ बरोबरीत आणला. सामन्याची वेळ संपल्याने पेनल्ट्री स्ट्रोकचा वापर करण्यात आला. यामध्ये दोन मराठा लाइट इन्फंट्री संघाकडून कृष्णात पाटील, विजय पाटील, संदीप शिंदे यांनी गोल केले; तर ‘देवगिरी’कडून मयूर पाटील, शुभम सुतार, ओंकार कावरे व अनिकेत मोरेने गोल करीत संघाने विजयीपद पटकावले.

सामन्यात पंच म्हणून मुकुंद रजपूत, शिवाजी डुबल, विजय जाधव, चेतन जाधव यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस महासंचालकांचे पदक मिळल्याबद्दल २७ पोलीस कर्मचारांचा सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरणप्रसंगी नगरसेविका स्वाती यवलुजे, माधुरी लाड, मोहन सालपे, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, प्रवीण केसरकर, राजेश लाटकर, डी. डी. पाटील, विलास साठे, सचिन झंवर, शशिकांत खोत, बाबासो चौगुले, कुमार आगळगावकर उपस्थित होते.


कोल्हापुरात लाईन बझार येथे आयोजित सतेज चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील विजेत्या देवगिरी फायटर्स संघाला बक्षीस प्रदान करताना आमदार सतेज पाटील, महापौर सरिता मोरे व पदाधिकारी.

Web Title: Degree Fighters winner - Maratha Light Infantry Runner-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.