आमने सामने येणार धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:33 AM2018-10-10T05:33:02+5:302018-10-10T05:33:34+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत सामन्यात नेहमीच एकमेकांसोबत खेळणारे धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये होईल.
भुवनेश्वर : आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत सामन्यात नेहमीच एकमेकांसोबत खेळणारे धनराज पिल्ले आणि दिलीप तिर्की एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडिअममध्ये होईल.
भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअममध्ये २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान विश्व चषकाचे आयोजन होणार आहे. त्या निमित्त विशेष प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले जाईल.
धनराज पिल्ले यांच्या संघात पी.आर. श्रीजेश,वीरेन रासकिन्हा, सरदार सिंह, संदीप सिंह, एस.व्ही सुनिल यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह असतील. तिर्की यांच्या संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिरएलो आहेत. तर संघात इग्नेस टिर्की, व्ही.आर. रघुनाथ, दीपक ठाकूर, रुपिंदरपाल सिंह आहेत. धनराज आणि तिर्की यांनी आपल्या कारकिर्दीत पीएचएल व्यतिरिक्त कधीच एकमेकांविरोधात खेळले नाही. दोन्ही खेळाडू भारतीय संघ व एअरलाईन्सकडून एकमेकांसह खेळले आहेत.
महान डिफेंडर तिर्की म्हणाले की, ‘मला आठवत नाही आम्ही कधी एकमेकांविरोधात खेळलो. कदाचीत पीएचएलकडून खेळलो असु शकतो. हा सामना अनोखा असेल.’ (वृत्तसंस्था)